5000+

Satisfied Clients

संस्थेविषयी

आपल्या उज्ज्वल भविष्याचा साथीदार!
1997 पासून बँकिंग विश्वासाच्या सेवेत

साईबाबा जनता सहकारी बँकेची स्थापना 1997 साली झाली. समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना सक्षम बनवण्याचे ध्येय ठेवून बँकेने सर्वसामान्यांची बँक म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. गेल्या २५ वर्षांत बँकेने सातत्याने प्रगती केली आहे. पारदर्शक कार्यपद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत बँकेने आपली प्रगती गतीशील केली आहे.

बँकेचे मुख्य उद्दिष्ट ग्रामीण भागातील लोकांना सोपी, सुलभ आणि उपयोगी बँकिंग सेवा उपलब्ध करून देणे आहे. बँक विविध प्रकारच्या ठेव योजना, कर्ज योजना, बचत खाते आणि इतर बँकिंग सेवांसह ग्रामीण लोकांना आर्थिक मदत पुरवते.

साईबाबा जनता सहकारी बँक नेहमीच प्रगती करत आहे. बँकेचे भागधारक, खातेदार, ग्राहक, कर्मचारी आणि हितचिंतक यांचा या यशात मोठा सहभाग आहे. त्यांच्या समर्थनामुळे आम्हाला उत्कृष्ट आर्थिक कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते. बँकेने विविध आधुनिक तंत्रज्ञानाची अंमलबजावणी केली असून, त्यामुळे आम्ही ग्राहकांना जलद आणि अचूक सेवा देण्यासाठी सक्षम आहोत.

about-img

व्हिजन

ग्राहकांच्या आर्थिक उन्नतीसाठी नाविन्यपूर्ण, पारदर्शक आणि विश्वासार्ह बँकिंग सेवा प्रदान करून आदर्श सहकारी बँक बनणे.

आर्थिक स्थिरता, प्रगती आणि सामाजिक उत्तरदायित्वाला प्राधान्य देत ग्राहक व समाजाचा सर्वांगीण विकास घडविणे. तसेच, भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून सकारात्मक योगदान देणे.

मिशन

  • संस्थेच्या सभासद आणि ग्राहकांच्या आर्थिक गरजा समजून घेऊन त्यांना उत्कृष्ट आर्थिक सेवा व सुविधा पुरवणे.
  • पारदर्शकता, विश्वास आणि सामाजिक बांधिलकीसह आर्थिक सेवांमध्ये सतत सुधारणा करणे.
  • तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून आर्थिक सेवा सर्वांपर्यंत पोहोचवणे.
  • स्थानिक उद्योग, व्यवसाय व उद्योजकतेला प्रोत्साहन देणे व त्याद्वारे समाजाच्या प्रगतीस हातभार लावणे.
जे. जी सगरे
अध्यक्ष

ग्रामीण भागातील जनतेच्या आर्थिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि समाजातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत घटकांना अधिक सक्षम करण्यासाठी साईबाबा जनता सहकारी बँकेची १९९७ साली स्थापना झाली.तेव्हापासून गेली २५ वर्ष सर्वसामान्यांसाठी विश्वसनीय बँक म्हणून या संस्थेने नावलौकिक मिळवला आहे.

पारदर्शक व्यवहार,तत्पर सेवा आणि आधुनिक तंत्रज्ञान यामुळे साईबाबा सहकारी बँक एकविसाव्या शतकातील प्रगतीशील सहकारी बँक आहे. बँकेचे मुख्य उद्दिष्ट हे ग्रामीण भागातील लोकांना सोपी, सुलभ आणि तत्पर बँकिंग सेवा उपलब्ध करून देणे आहे त्यासाठी तरुण,महिला आणि विविध समाज घटकांना वित्तपुरवठा करणे तसेच आर्थिक समावेशनाच्या माध्यमातून अधिकाधिक जनतेला बँकिंग व्यवहारांमध्ये सामावून घेण्यासाठी मुदत ठेव,बचत खाते यांसारख्या इतर बँकिंग सेवा देखील साईबाबा बँक प्रभावीपणे राबवते आहे. गेल्या २५ वर्षांच्या प्रवासात संस्थेचे ५००० हून जास्त आनंदी आणि समाधानी ग्राहक आहेत या प्रगतीत संस्थेच्या ग्राहक,खातेदार ,भागधारक कर्मचारी आणि हितचिंतकांचा मोठा सहभाग घेतला आहे त्यांच्या प्रेरणेमुळेच आम्ही सातत्याने उत्तरोत्तर आर्थिक प्रगती करत आहोत अर्थचक्राची गती आणि सामाजिक प्रगती एकमेकांच्या हातात हात घेऊन चालते हा आमचा विश्वास आहे.त्यामुळे गतिमान आर्थिक सेवांच्या माध्यमातून स्थानिक व्यवसाय आणि उद्योगाला प्रोत्साहन देत समाजाची प्रगती आणि आर्थिक स्थिरतेला चालना देऊन भारताच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी संस्था सकारात्मक योगदान देत आहे.

सहकारी बँकिंग क्षेत्राचा लातूर जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्यात मोठा वाटा आहे.या सहकारी संस्थांच्या यादीत साईबाबा जनता सहकारी बँक अग्रगण्य म्हणून गणली जाते. ग्रामीण भागातील जनतेच्या आर्थिक विकासासाठी १९९७ साली संस्थेचे लोकार्पण झाले. तेव्हापासून उत्कृष्ट बँकिंग तत्त्वांची अंमलबजावणी, पारदर्शक व्यवहार,जलद सेवा आणि त्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाची जोड या विविध वैशिष्ट्यांमुळे कमी कालावधीतच यशस्वी संस्था म्हणून साईबाबा जनता सहकारी बँकेने नावलौकिक प्राप्त केला.

याच उद्देशाला आपले जीवनध्येय मानून साईबाबा जनता सहकारी बँकेचे सर्व कर्मचारी अहोरात्र झटत असतात. भारताच्या गतिमान अर्थव्यवस्थेला साजेशी आधुनिक धोरणे आणि कार्यप्रणाली असा संयोग साधून सेवा देण्यासाठी संस्था विख्यात आहे.

लातूर जिल्हा आणि मराठवाड्यातील अर्थव्यवस्थेला हातभार लागावा तसेच या परिसरातील तरुण,महिला यांना रोजगार निर्मितीची संधी मिळावी आणि शेतकरी ,युवा उद्योजक यांना आपली आर्थिक प्रगती साधता यावी या ध्येयावरती संस्था सातत्याने मार्गक्रमण करत आहे. आर्थिक प्रगती बरोबरच सामाजिक उन्नती साधण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजसेवा करण्याचा देखील संस्थेचा संकल्प आहे. या मूल्यांवरती गेली २५ वर्षांहून जास्त का काळ संस्था प्रामाणिकपणे कार्यरत आहे.

सोनू डगवाले
उपाध्यक्ष