मुदत ठेव योजना

आजच्या वाढत्या महागाईच्या काळात, आपल्या कमाईची योग्य बचत करणे अत्यावश्यक आहे. जर तुम्हाला तुमच्या पैशांवर जोखीममुक्त चांगला परतावा हवा असेल, तर आमची मुदत ठेव योजना (FD) हा सर्वोत्तम पर्याय आहे.

आम्ही तुम्हाला बचत करण्यास मदत करतोच, शिवाय ठराविक कालावधीसाठी आकर्षक व्याजदर (FD Interest Rate) देऊन तुमची बचतही वाढवतो. या योजनेत तुम्ही एका निश्चित कालावधीसाठी मोठी रक्कम जमा करू शकता आणि मुदतपूर्तीनंतर गुंतवलेली रक्कम अधिक व्याजासह परत मिळवू शकता. अधिक माहितीसाठी आमच्या साईबाबा जनता सहकारी बँकच्या जवळच्या शाखेला भेट द्या. सुरक्षित भविष्यासाठी आता बचतीला सुरुवात करा.

दामदुप्पट ठेव योजना

तुमच्या अनेक स्वप्नांना आर्थिक पंख देण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत दामदुप्पट ठेव योजना. तुमच्या मेहनतीने कमावलेल्या पैशांना दुप्पट परतावा मिळवून देणारी ही योजना तुमचं आर्थिक भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आदर्श आहे. या योजनेअंतर्गत, ठराविक कालावधीसाठी तुमची रक्कम गुंतवा आणि मुदतपूर्तीच्या शेवटी दुप्पट रक्कम परत मिळवा. आकर्षक व्याजदर आणि पूर्णपणे सुरक्षित प्रक्रिया यामुळे ही योजना तुमच्यासाठी फायद्याची ठरते.

महागाईच्या काळात तुमच्या बचतीला गती देण्यासाठी आणि आर्थिक स्थिरता मिळवण्यासाठी ही योजना उपयुक्त आहे. सोपी आणि जलद प्रक्रिया, खात्रीशीर परतावा आणि दीर्घकालीन लाभ हे या योजनेची मुख्य वैशिष्ट्यं आहेत.आजच गुंतवणूक करा आणि तुमच्या पैशांना वाढवण्यासाठी योग्य निर्णय घ्या! अधिक माहितीसाठी आमच्या साईबाबा जनता सहकारी बँकच्या जवळच्या शाखेला भेट द्या.

आवर्त ठेव योजना

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही महत्वाचे टप्पे हे आर्थिक भार वाढविणारे असतात जसे की उच्चशिक्षण, लग्न, गृह खरेदी इत्यादी. पण अशा प्रकारच्या मोठ्या खर्चासाठी जर तुम्ही नियमितपणे छोट्या रकमेची बचत केली तर? असे दरमहा (RD) लहान रक्कम गुंतवून तुमचे उद्दिष्ट नक्कीच साध्य होतील. आमचे कर्मचारी तुमच्या आर्थिक उद्दिष्टांना विचारात घेऊन तुम्ही किती कालावधीसाठी ही गुंतवणूक केली पाहिजे याचे तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करतील तसेच यासाठी तुम्हाला आकर्षक व्याजदर (RD Interest Rate) सुद्धा देऊ करतील.

लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही नियमितपणे पैशांची बचत करण्यास सुरुवात करता तेव्हा ती पैसे वाचवण्याची सवय तुमच्यात विकसित होत जाते जी तुम्हाला आर्थिकरित्या अधिक सक्षम बनविते. अधिक माहितीसाठी आमच्या साईबाबा जनता सहकारी बँकच्या जवळच्या शाखेला भेट द्या.

त्रैमासिक व्याज ठेव योजना

तुमच्या आर्थिक गरजांसाठी आणि नियमित उत्पन्नाच्या इच्छेसाठी आम्ही घेऊन आलो आहोत त्रैमासिक व्याज ठेव योजना. या योजनेद्वारे तुम्ही ठराविक कालावधीसाठी तुमची रक्कम गुंतवू शकता आणि प्रत्येक तीन महिन्यांनी आकर्षक व्याजाचा लाभ घेऊ शकता. ही योजना सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय असून, तुमच्या मेहनतीच्या पैशांवर नियमित आणि खात्रीशीर परतावा देते.

महागाईच्या काळात नियमित व्याज उत्पन्न मिळवण्यासाठी ही योजना उपयुक्त आहे. त्रैमासिक व्याज वितरणामुळे तुम्हाला आर्थिक गरजा वेळोवेळी पूर्ण करणे सोपे जाते. सोपी प्रक्रिया, कमी गुंतवणूक कालावधी, आणि उच्च व्याजदर ही योजनेची वैशिष्ट्यं आहेत. आजच गुंतवणूक करा आणि तुमच्या बचतीला नियमित परताव्याच्या स्वरूपात नवा अर्थ द्या! अधिक माहितीसाठी आमच्या साईबाबा जनता सहकारी बँकच्या जवळच्या शाखेला भेट द्या.