वैयक्तिक कर्ज

तुमच्या गरजांसाठी सोपी आर्थिक मदत. तुमच्या वैयक्तिक गरजांसाठी त्वरित आर्थिक सहाय्य हवे असल्यास वैयक्तिक कर्ज हा योग्य पर्याय आहे. घरगुती दुरुस्ती, शिक्षण, वैद्यकीय खर्च, प्रवास, लग्न समारंभ किंवा अन्य वैयक्तिक कारणांसाठी हे कर्ज सहज उपलब्ध आहे. कोणत्याही प्रकारच्या तारणाशिवाय हे कर्ज जलद मंजूर होते. सोपी प्रक्रिया, कमी व्याजदर, आणि परतफेडीसाठी सोपे पर्याय यामुळे वैयक्तिक कर्ज तुमच्यासाठी अधिक सोयीचे ठरते.

तुमच्या गरजेनुसार तयार करण्यात आलेल्या योजना आणि सोप्या अटींमुळे तुमच्यासाठी हे कर्ज अधिक फायदेशीर ठरेल. तुमच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी आणि तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आजच वैयक्तिक कर्जाचा लाभ घ्या. अधिक माहितीसाठी आमच्या साईबाबा जनता सहकारी बँकच्या जवळच्या शाखेला भेट द्या.

सॅलरी लोन

एखाद्या व्यावसायिकाला रोज काही प्रमाणात आर्थिक उपलब्धता असते, परंतु नोकरदार वर्गाचे आर्थिक गणित पूर्णतः त्यांच्या पगाराच्या तारखेस अवलंबून असते. अशावेळी, जर पगाराच्या तारखेआधीच एखादी आर्थिक अडचण निर्माण झाली तर काय कराल? काळजी करू नका! साईबाबा जनता सहकारी बँक लि., लातूर तुमच्यासारख्या नोकरदार वर्गासाठी सॅलरी लोन (Salary Loan) सुविधा घेऊन आली आहे. याच्या मदतीने तुम्हाला तात्काळ आर्थिक मदत मिळते, ज्यामुळे पगाराच्या तारखेची वाट पाहण्याची गरज नाही.

तुमच्या मासिक पगाराच्या आधारावर आम्ही तुम्हाला कमीत कमी कागदपत्रांवर झटपट कर्ज उपलब्ध करून देतो. मग ते आर्थिक अडचण दूर करणे असो किंवा तुमची छोटी-मोठी स्वप्नं पूर्ण करणे, सॅलरी लोन हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा!

बिझनेस लोन

स्वतःचा व्यवसाय सुरू करणे किंवा त्याचा विस्तार करणे हे प्रत्येक उद्योजकाचे स्वप्न असते. व्यवसायाच्या गरजेनुसार भांडवलाची आवश्यकता असते, आणि यासाठी बिझनेस लोन हा एक विश्वासार्ह पर्याय ठरतो. बिझनेस लोनच्या माध्यमातून आपण आपल्या व्यवसायासाठी आवश्यक भांडवल, यंत्रसामग्री, नवीन तंत्रज्ञान, किंवा विस्तारासाठी जागा सहज मिळवू शकता. कमी व्याजदर, सोपे परतफेडी पर्याय, आणि जलद प्रक्रिया ही बिझनेस लोनची वैशिष्ट्ये आहेत, जी उद्योजकांच्या प्रगतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात.

आमच्या बिझनेस लोनच्या माध्यमातून, आपल्याला आपल्या व्यवसायाच्या विस्तारासाठी गरज असणारी रक्कम आणि योग्य योजनांचा आधार आमच्याकडून मिळेल. जर तुम्हाला व्यवसायात उंच भरारी घ्यायची असेल, तर बिझनेस लोनचा लाभ घ्या आणि तुमचे उद्योजकीय स्वप्न साकार करा. अधिक माहितीसाठी आमच्या साईबाबा जनता सहकारी बँकच्या जवळच्या शाखेला भेट द्या.

गोल्ड लोन

कोणतीही आर्थिक अडचण? गोल्ड लोन हा सर्वोत्तम उपाय!

कोणतीही आर्थिक अडचण आल्यावर आपण सर्वात आधी खिशातील तरतूदीचा विचार करतो. त्यानंतर आपल्या जवळ असलेल्या दागिन्यांचा पर्याय पाहतो, आणि यात काहीही गैर नाही. कारण तातडीने निधी उभारण्यासाठी गोल्ड लोन हा आजच्या काळातील सर्वात विश्वासार्ह आणि लोकप्रिय पर्याय ठरला आहे.

आम्ही तुम्हाला सर्वोत्तम गोल्ड लोन सुविधा उपलब्ध करून देत आहोत, जिथे तुमच्या सोन्याचे योग्य मूल्य ठरवून तुम्हाला त्वरित आर्थिक मदत दिली जाईल. कमी कागदपत्रे, सोपी अटी, आणि जलद प्रक्रिया यासह तुम्हाला गोल्ड लोन सहज मिळू शकते. त्वरित आणि सोप्या पद्धतीने गोल्ड लोन मिळवण्यासाठी जवळच्या शाखेला आजच भेट द्या!

वाहन तारण कर्ज

तुमच्या आर्थिक गरजांवर योग्य तोडगा काढण्यासाठी वाहन तारण कर्ज हा विश्वासार्ह आणि सोपा पर्याय आहे. तुमचे वाहन तारण ठेवून तुम्ही कमी वेळेत आवश्यक रक्कम मिळवू शकता. हे कर्ज वैयक्तिक गरजा, व्यवसाय वाढवणे, किंवा आपत्कालीन खर्चांसाठी उपयुक्त ठरते. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी, आणि आकर्षक व्याजदर ही वाहन तारण कर्जाची वैशिष्ट्ये आहेत. शिवाय, तुमच्या वाहनावर तुमचे हक्क कायम राहतात, ज्यामुळे ही योजना अधिक लाभदायक ठरते.

तुमच्या वाहनाच्या बाजारमूल्याच्या आधारावर योग्य कर्ज मर्यादा ठरवली जाते, तसेच परतफेडीसाठी लवचिक पर्याय उपलब्ध आहेत. जर तुम्हाला त्वरित आर्थिक मदतीची गरज असेल तर वाहन तारण कर्जाचा पर्याय निवडा आणि तुमच्या समस्या सहज सोडवा. तुमचे वाहन सुरक्षित ठेवा आणि गरजा पूर्ण करा! अधिक माहितीसाठी आमच्या साईबाबा जनता सहकारी बँकच्या जवळच्या शाखेला भेट द्या.

होम लोन

तुमच्या स्वप्नातील घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी…

स्वतःचे हक्काचे घर घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. जिथे आपण आपल्या कुटुंबासोबत आनंदाने जीवन व्यतीत करू शकतो. मात्र, वाढत्या महागाईमुळे घर खरेदी करणे काहीसे कठीण वाटत असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. साईबाबा जनता सहकारी बँक लि., लातूर तुमच्यासाठी घेऊन आली आहे होम लोन सुविधा.

आमच्या होम लोन सुविधेमुळे तुम्हाला तुमच्या आर्थिक अडचणींवर मात करत तुमचे घर खरेदीचे स्वप्न साकार करता येईल. अधिक माहितीसाठी आणि तुमच्या गरजेनुसार सर्वोत्कृष्ट योजना जाणून घेण्यासाठी आजच आमच्या बँकेला भेट द्या. तुमचे हक्काचे घर आता दूर नाही! अधिक माहितीसाठी आमच्या साईबाबा जनता सहकारी बँकच्या जवळच्या शाखेला भेट द्या.

कॅश क्रेडिट कर्ज

व्यवसाय म्हटला की स्पर्धा ही आलीच आणि स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर उत्तम आर्थिक नियोजन आणि अनपेक्षित आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी उपाय हे तयार असलेच पाहिजे. आम्ही तुमच्या व्यवसायाचे योग्य आर्थिक गणित बसवून देण्यात मोलाचा हातभार लावण्यास वेगवेगळ्या योजना राबवितो ज्यातील एक आहे कॅश क्रेडिट कर्ज (Cash Credit Loan).

अनेकदा व्यवसायात रोख रकमेची गरज लागते आणि अशावेळी कोणाकडून अधिक व्याजदर देऊन किंवा काही गहाण ठेऊन रोखेची गरज भागविण्यापेक्षा आमच्या कॅश क्रेडिट कर्ज योजनेचा लाभ घ्या. यामध्ये आम्ही तुम्हाला ठरविक रक्कम क्रेडिट म्हणून तात्काळ उपलब्ध करून देतो ज्यामध्ये तुम्ही जितकी रोख रक्कम वापराल फक्त तेवढ्याच रकमेवर व्याज आकारले जाईल आणि वापरलेली रक्कम जर तुम्ही त्याच दिवशी खात्यात जमा केली तर त्यावर कोणतेही व्याज आकारले जात नाही. अधिक माहितीसाठी आजच आमच्या बँकेशी संपर्क साधा.

टर्म लोन

अनेकदा व्यावसायिकांना किंवा कंपन्यांना त्यांच्या प्रकल्पांच्या वेगवेगळ्या गरजांसाठी मजबूत आणि तत्पर आर्थिक पाठबळ आवश्यक असते आणि हेच ओळखून आम्ही घेऊन आलो आहोत मुदत कर्ज योजना (Term Loan). एखादे नवीन युनिट उभारणे, चालू युनिटचा विस्तार करणे, प्रकल्पासाठी मालमत्ता खरेदी करणे, यंत्रसामग्री खरेदी करणे यांसारख्या वेगवेगळ्या बाबींसाठी तुम्ही या कर्जाचा उपयोग करू शकता.

आता तुमच्या प्रकल्पाच्या विस्तार, विविधीकरण किंवा आधुनिकीकरणासाठी आर्थिक अडचणींमुळे अडथळा येणार नाही. आम्ही तुमच्यासाठी विश्वासार्ह आणि सुलभ टर्म लोन सुविधा उपलब्ध करून देत आहोत. अधिक माहितीसाठी आजच आमच्या बँकेशी संपर्क साधा!

माल तारण कर्ज

शेतकरी आणि व्यापारी वर्गासाठी माल तारण कर्ज योजना एक महत्त्वपूर्ण आर्थिक साधन ठरते. शेतमाल, धान्य, किंवा व्यापारातील अन्य वस्तू गोदामात सुरक्षित ठेवून त्यांच्या बाजारमूल्याच्या आधारे त्वरित कर्जाची सुविधा मिळते. हमीभावातील चढ-उतार, पीक नुकसानीची चिंता किंवा व्यापारातील भांडवली अडचणी यावर मात करण्यासाठी ही योजना खूपच उपयुक्त आहे. तातडीच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सोपी प्रक्रिया आणि कमी व्याजदर यामुळे कर्जाचा लाभ सहज घेता येतो.

माल तारण कर्जामुळे शेतकऱ्यांना किंवा व्यापाऱ्यांना बाजारातील योग्य भाव येईपर्यंत माल विक्री करण्याची वाट पाहता येते. त्यामुळे त्यांना बाजारातील अस्थिरतेपासून संरक्षण मिळते. ही योजना व्यवसाय वाढीसाठी भांडवल पुरवण्याबरोबरच शाश्वत आर्थिक स्थैर्य साधण्यासाठी मदत करते. अधिक माहितीसाठी आमच्या साईबाबा जनता सहकारी बँकच्या जवळच्या शाखेला भेट द्या.

मुदत ठेव कर्ज

एखादी अनपेक्षित आर्थिक अडचण तुमच्यासमोर उभी आहे का? यासाठी तुम्ही आता मुदत ठेव (FD) वेळेपूर्वीच मोडण्याचा विचार करत आहात का? तर थोडे थांबा आणि आमच्या मुदत ठेवींवर कर्ज या सुविधेचा लाभ घ्या. तुमची मुदत ठेव न मोडता आर्थिक अडचणींचा सामना करा. आम्ही हे जाणतो की कालांतराने बचत करण्याचा आणि तुमची संपत्ती वाढवण्याचा एक मार्ग म्हणजे मुदत ठेव (FD).

परंतु आर्थिक आपत्कालीन परिस्थिती कोणावरही कधीही येऊ शकते आणि अशावेळी तात्काळ निधीची आवश्यकता असल्याने तुमच्या दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांना धक्का पोहचू शकतो. या परिस्थितींचा विचार करूनच आम्ही एक सोयीस्कर मुदत ठेवी कर्ज (Loan Against Deposit) सुविधा आमच्या ग्राहकांसाठी उपलब्ध केली आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या मुदत ठेवी वेळेपूर्वीच मोडू न देता त्याबदल्यात त्वरित रोख रक्कम मिळवू शकता. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आमच्या बँकेला भेट द्या.